रावेर येथील पाझर तलावाची उंची वाढवा

0

धुळे । तालुक्यातील रावेर येथील ग्रामस्थांनी पाझर तलावाची उंची वाढविण्यात यावी किंवा नवीन बंधारा बांधण्यात यावा, यासाठी संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, भाटमाई पाझर तलावाची उंची वाढविण्यात यावी, तसेच तलावात नवीन बंधारा बांधण्यात यावे. यामुळे रावेर, जुन्नेर, रावेर, जुन्नर, मोरशेवडी, संडगाव या गावाचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या परिसरातील शेती ओलीताखाली येऊन शेतीचा पाण्याचा प्रश्‍नही सुटेल याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल म्हणून त्वरीत ही बट भाटमाई पाझ तलावाच्या उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देताना सरपंच साहेबराव देवरे, सरपंच निनाजीराव देवरे, उपसरपंच भूषण देवरे, गोपीनाथ देवरे, बुधा देवरे, जानदेव देवरे, सोपान वाघ, जगन्नाथ देवरे, देवचंद बेडसे, तुकाराम देवरे, विजय देवरे, अशोक वाघ, सदा देवरे, व रावेर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.