रावेर । रावेर शहरातील अभियंत्यांकडून नुकताच ‘इंजिनिअर’डे साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील अभियंते उपस्थित होते. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानिमित्ताने एसीसी सिमेंटतर्फे येथील मानस गार्डन मध्ये छोटाखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभियंता अध्यक्ष राजेंद्र कोल्हे यांनी आताच्या परिस्थितीत अभियंत्यांच्या कामात कसा बदल झाला यावर मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अभियंता मनीष अग्रवाल, पवन वैद्य, विकास पाटील, आर.आर. पाटील, राजेश सोनवणे, रामेश्वर जाधव, अमित हिवरे, मयूर कासार आदी उपस्थित होते.