रावेर । येथील नेहरु युवा केंद्र जळगाव व भिमालय बहुउद्देशीय संस्था मार्फत चालविलेला युवा नेतृत्व व समुदाय विकास प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. यात शहरातील युवक व समाज कार्यकर्ते सक्रिय असणार्या समाज सुधारकांनी व विविध मार्गदर्शकांनी आपले मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सोपान पाटील उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
यावेळी माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, विद्यमान उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नगरसेवक अॅड. योगेश गजरे तसेच युवक कांग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष पंकज वाघ उपस्थित होते. जिल्हा समन्वयक अतुल निकम, सुनील पंजे यांच्या मार्गदर्शनाखाली भिमालय संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक तायडे, आभार प्रदर्शन आशुतोष घेटे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीवितेसाठी भिमालय संस्थेचे कार्यकर्ते वसीम कुरेशी, रुपेश गाढे, आकाश मेढे, कुणाल मेढे, विशाल दामोदरे, निशाण म्हसाने, अविनाश लहासे, अमर पारधे, मनोज घेटे, रवींद्र डोळे, राहुल गजरे, अंकुश गजरे, रोहित गजरे, शुभम घेटे यांनी परिश्रम घेतले.