रावेर । शहरातील जेडीसीसी बँकेसमोरील पान दुकानाला अचानक आग लागल्याने सुमारे 25 हजारांचे नुकसान झाल्याची घटना 12 रोजी रात्री 11 वाजता घडली. बस स्थानकाला लागून व जेडीसीसी बँकेसमोर शांताराम बाबूराव महाजन यांचे अनेक वर्षांपासून पानसुपारीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन महाजन घरी गेले असता 12 रोजी रात्री सुमारे 11 वाजता आग लागली. दरम्यान, एमएसईबीच्या अधिकार्यांनी दुकानाला भेट दिली असता शॉर्टसर्किटमुळे आग लागली नसल्याचे त्यांनी प्राथमिक पाहणीत सांगितले. यावेळी रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी पान दुकानाला भेट दिली.