रावेर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीरास प्रतिसाद

0

रावेर । येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनीचे औचित्य साधून पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फौउंडेशन कांताई नेत्रालय, शेतमाल प्रक्रिया संस्था रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदु चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. यावेळी 110 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन यातील 15 रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात आले.

15 रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन माळी समाजाचे अध्यक्ष रमेश महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शेतमाल प्रक्रिया संस्थेचे चेअरमन सोपान पाटील, संचालक जिजाबराव पाटील, एल.डी. निकम, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, नगीन पाटील, गणेश फुलमाळी, आसाराम महाजन, ज्ञानबा महाजन आदी मान्यवर उपस्थितीत होते. रमेश महाजन यांनी क्रांतीज्योती साविवत्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिल्यामुळे आज देशात महिलांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे महिलांना देखील निर्णय प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाला आहे. त्यांच्या कार्यातून आदर्श घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना केले. या शिबीरात डॉ.ब्रिजेश यांनी 110 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली तर 15 रूग्णांना मोतीबिंदू आढळून आल्याने शस्त्रक्रियेसाठी त्यांना कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. शिबीर यशस्वी करण्यासाठी युवराज देसर्डा, प्रमोद जैन व खान्देश माळी महासंघ रावेल तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांनी सहकार्य केले.