रावेर। सरकारने अॅडव्होकेट अॅक्ट 2017 हे बिल मंजुर केले असून ते वकिलांच्या हिताविरोधात असल्यामुळे यामुळे देशातील वकिलांवर अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यानिषेधार्थ बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार शुक्रवार 21 रोजी दुपारी 3 वाजता स्टेशन रोड येथे या विधेयकाची होळी करण्यात आली. तसेच दुपार नंतर वकिलांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग नोंदविला नाही.
आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी वकिल संघाचे उपाध्यक्ष अॅड. योगेश गजरे, सचिव अॅड. भरत पाटील, खजीनदार अॅड. शितल जोशी, एस.एस. फालक, अॅड. व्ही.पी. महाजन, अॅड. मधुसुदन चौधरी, अॅड. विपिन गडे, अॅड. जे.एस. तिवारी, अॅड. एस. एस. सैय्यद, अॅड. धनराज पाटील, अॅड. बाबाजी वाले, अॅड. जगदीश महाजन, अॅड. विनोद कोंधे, अॅड. प्रमोद विचवे, अॅड. एस.बी. सांगळे, अॅड. तुषार चौधरी अॅड. बी.डी. निळे, अॅड. दिपक गाढे, अॅड. मिलींद पाटील, अॅड. शाहिद शेख, अॅड. उदय सोनार, अॅड. राजकुमार लोखंडे, अॅड. निलेश लोखंडे, अॅड. भुषण पाटील, अॅड. सतिष वाघोदे, अॅड. कवडीवाले, अॅड. पवन पाटील, अॅड. धीरज पाटील, अॅड. तुषार माळी, अॅड. एल.के. शिंदे, अॅड. व्ही.बी. कोंधे यासह वकिल उपस्थित होते.