रावेर येथे शिबिरात 220 रुग्णांची मोफत मोतीबिंदू तपासणी

0

रावेर । येथे पुणे अंधजन मंडळ, भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव व फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यात सुमारे 220 रुगणाची तपासणी करण्यात येवून 32 जणांना शस्त्रक्रियेसाठी जळगांव येथे नेण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष हरिश गनवाणी, उद्घाटक रावेरचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, नायब तहसीलदार सी.एस.पाटील, कामगारनेते दिलीप कांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सोपान पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सीमा भालेराव, विष्णु महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अ‍ॅड. दिपक गाढे, अ‍ॅड. सुभाष धुंदले, लालचंद पाटील, बल्ला उस्ताद, बबलु नगरीया, समाधान पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात डॉ. भारत साळवे, डॉ. प्रमोद जैन, युवराज देसर्डा, कांताबाई नेत्रालयाचे मॅनेजर अमर चौधरी यांनी सुमारे 220 रुग्णांच्या डोळयाची तपासणी केली. 32 रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नत्रालय जळगाव येथे नेण्यात आले.

यांचे लाभले सहकार्य
शिबिर यशस्वीतेसाठी फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, उपाध्यक्ष राजु सवर्णे, सचिव जगदीश घेटे, सहसचिव दिलीप कांबळे, कोषाध्यक्ष बाळु शिरतुरे, सदस्य संघरक्षक तायडे, अनिल गाढे यांच्यासह खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन व सहकार्‍यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल.डी.निकम यांनी तर आभार फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी मानले.