रावेर येथे 8 डिसेंबरपासून रंगपंचमी व्याख्यानमाला

0

यंदाचे 17 वे वर्ष ; नामांकित वक्त्यांची होणार व्याख्याने

रावेर- शहरात सालाबादाप्रमाणे रंगपंचमी व्याख्यानमालेचे 8 ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून यंदाचे 17 वर्ष आहे. व्याख्यानमालेच्या यशस्वी आयोजनासाठी भंवरलाल अ‍ॅण्ड कांताई मल्टिपर्पज, हरेश तोलानी (जळगाव) आणि ओम सुपर शॉप यांचे सहकार्य लाभले आहे. व्याख्यानमालेचे विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष सचिन जाधव, सचिव विठोबा पाटील यांच्यासह सर्व सदस्य नियोजन करीत आहेत.

या वक्त्यांची होणार व्याख्याने
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 8 डिसेंबर माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी प्रकट मुलाखतीतून गुंफणार आहेत. दुसर्‍या पुष्प 9 रोजी पुण्याच्या अनुराधा प्रभूदेसाई ‘ऋणानुबंध सैनिकांशी- कारगील शौर्यगाथा’ या विषयावर गुंफतील तसेच 10 रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांचे ‘ स्त्री-काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. 11 रोजी अश्विनी मयेकर (मुंबई) या ‘पालक आणि मुलांमधील संवाद’ या विषयावर व्याख्यान देतील तसेच 12 रोजी राहूल सोलापूरकर हे ‘दिशा स्वातंत्र्य वीरांची-दशा आजच्या युवकांची’ या विषयावर व्याख्यान देतील. शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलच्या अग्रवाल रंगमंचावर रोज संध्याकाळी साडेसहा वाजता व्याख्यान होणार असून शहरातील श्रोत्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.