रावेर लोकसभा क्षेत्रातील मुख्याधिकारी यांचेकडून अमृत २ व घरकुल योजनांचा आढावा घेऊन रक्षा खडसे यांनी केल्या सूचना.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
कोथळी येथील निवासस्थानी रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, बोदवड, वरणगांव, शेंदुर्णी, रावेर, सावदा व भुसावळ नगरपंचायत , नगरपालिका यांच्या मुख्याधिकारी यांची बैठक घेवून, अमृत २ व केंद्र सरकार पुरस्कृत घरकुल योजनेचा कामांचा आढावा घेतला. तसेच संबंधित शहरातील नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने नव्याने अमृत २ योजनेचा तत्काळ प्रस्ताव सादर करणे बाबत सूचना केल्या.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह मुक्ताईनगर व बोदवड मुख्याधिकारी गजानन तायडे, वरणगांव मुख्याधिकारी समीर शेख, शेंदुर्णी मुख्याधिकारी पिंजारी, रावेर मुख्याधिकारी श्रीमती मालगवे, सावदा मुख्याधिकारी चव्हाण, भुसावळ मुख्याधिकारी वाघमोडे उपस्थित होते.