रावेर लोकसभा क्षेत्रात दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराच्या नियोजनाबाबत खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतली बैठक.

मुक्ताईनगर प्रतिनिधी….

प्रधानमंत्री .नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१७ सप्टेंबर पासून रावेर येथे केंद्रीय राज्यमंत्री .रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार शुभारंभ.

 प्रधानमंत्री .नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार* यांच्या द्वारा *भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यासाठी शिबीर आयोजनाबाबत आज खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी .आयुष प्रसाद, समाजकल्याण विभाग अधिकारी व ALIMCO अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे बैठक घेतली.

मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर” चे आयोजन करण्यात आले होते, आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांना संबंधित “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने” वाटप करण्यात येणार असून, प्रधानमंत्री .नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१७ सप्टेंबर रोजी रावेर येथे केंद्रीय राज्यमंत्री .रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री .गिरीश महाजन, पालकमंत्री .गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री .अनिल पाटील व माजी राज्यमंत्री .ओमप्रकाश (बच्चू) कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ होणार असून, त्यानंतर रावेर लोकसभा क्षेत्रातील इतर तालुक्यावर शिबिरामार्फत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी .अंकित, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी .राजेश लोखंडे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी .विजय रायसिंग व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO) अधिकारी उपस्थित होते.