मुक्ताईनगर । राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अर्थ व वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी केलेल्या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी आवाहनाला प्रतिसाद देत ‘एकच लक्ष – चार कोटी वृक्ष’ या संकल्पानुसार संपूर्ण रावेर मतदार संघात लोकसहभागातून वृक्ष लागवडीचे हरित मिशन राबविण्याचा झंझावात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी सुरु केला.
येथे झाला कार्यक्रम
राज्यात येत्या 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत यावर्षी शासनातर्फे 4 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. याअंतर्गत खासदार रक्षा खडसे यांनी रावेर येथील साईबाबा मंदिर, लालमाटी आणि जुनोना, बोदवड तालुक्यातील जामठी, मुक्ताईनगर तालुक्यातील हिवरा या ठिकाणी वृक्षारोपण केले.