रावेर लोकसभा संयोजकपदी नंदकिशोर महाजन तर सहसंयोजकपदी माधव गावंडे

0

रावेर- रावेर लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेश नियुक्त प्रभारी म्हणून नारायण गव्हाणकर यांची नियुक्ती केली तर रावेर लोकसभा क्षेत्राची संयोजन समिती जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ व बुलढाणा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी जाहीर केली आहे. संयोजक म्हणून जळगाव जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन तर सहसंयोजक म्हणून बुलढाणा जिल्हा सरचिटणीस माधव गणपतराव गावंडे यांची नियुक्ती केली आहे.

अन्य संयोजन समिती अशी
सोशल मीडिया संयोजक पंकज ज्ञानदेव भारंबे (मुक्ताईनगर), सोशल मीडिया सहसंयोजक राकेश वसंत फेगडे (यावल), मीडिया संयोजक निलेश विश्वासराव पाटील (फैजपूर), मीडिया सहसंयोजक राकेश शांताराम पाटील (चोपडा), लिगल संयोजक ऍड शिवाजी माधवराव सोनार (जामनेर), लिगल सहसंयोजक निखील रामचंद्र वायकोळे (भुसावळ), लाभार्थी संयोजक नेहा जितेंद्र गाजरे (सावदा), लाभार्थी सहसंयोजक विकास वामन अवसरमल (रावेर) यांची नियुक्ती करण्यात आली.