मुक्ताईनगराच्या बैठकीत ठराव ; सशक्त बुथ कमेट्यांशिवाय यश नाही -संदीप पाटील
मुक्ताईनगर- रावेर लोकसभेसह मुक्ताईनगर विधानसभेची जागा काँग्रेसला द्यावी, बुथ कमिट्या सशक्त कराव्यात, तरुण व प्रौढांची राजस्थान आणि मध्य प्रदेशाप्रमाणे एकत्री फळी उभी करावी, शक्ती अॅपसाठी जिल्ह्याचा निरीक्षक द्यावा या प्रमुख ठरावांना काँग्रेसच्या येथे झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तर राहुल गांधींच्या नेतृत्वात तीन राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली असून संपूर्ण देशात लवकरच काँग्रेसचे राज्य येणार असून राहुल गांधी पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवत राफेल घोटाळ्यात न्यायालयाची दिशाभूल करून क्लीन चिट मिळवून घेणार्या मोदी सरकारची घरवापसी झाल्याची टीका करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांनी येथे केली. बुथ कमिटी सशक्त झाल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही, असे सांगून त्यांनी शक्ती अॅपसाठी पूर्णवेळ संयोजक देण्याचे आवाहनही केले.
यांची होती उपस्थिती
मुक्ताईनगर येथे काँग्रेसच्या आढावा बैठकप्रसंगी मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, अजाबराव पाटील, चोपड्याचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक दिलीपसिंग पाटील, चोपडा शहराध्यक्ष आरीरफ भाई, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एस.ए.भोई, सरचिटणीस जगदीश पाटील, संजय पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, सरचिटणीस आसीफ, ईस्माईल खान, समद आझाद, अॅड.अरविंद गोसावी, डाचॅ.मधुश्री पाटील, महिला अध्यक्षा मनीषा जावरे, प्रा.पवन खरपडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केले. याप्रसंगी डॉ.जगदीश पाटील, शरद महाजन, अॅड.गोसावी, एस.ए.भोई यांचीदेखील भाषणे झाली. आभार प्रा. सुभाष पाटील यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी पंडित काळे, दिनेश पाटील, कासम ठेकेदार, नामदेवराव भोई, सलीम खान रशीद खान, भाऊराव महाजन, रवींद्र महाजन, डॉ.विष्णू रोटे, बाळू कांडेलकर, सतीश पाटील, निलेश पाटील, समाधान पाटील, रवी दांडगे, शेखर कापसे, अनिल सोनवणे, दिनकर भालेराव, शेख आरीफ, सादीक खान, वसीम शेख, शेख भैया शेख करीम, सलीम मंत्री, मुकेश महाजन, संजय धामोडे, नितीन निशानकर, विमल दैवे यांनी सहकार्य केले.