रावेर लोकसभेसाठी डॉक्टर उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीचे निमंत्रण

0

देवकरांच्या मधुबन निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी

जळगाव – काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे रावेर साठी आमदार जयंत पाटील यांना साकडे जळगाव काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन ही जागा काँग्रेसला सोडावी अशा मागणीचे साकडे जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज घातले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट डिप्लोमसी झाली.


यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील प्रदेश चिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील उदय पाटील शहराध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर सतीश पाटील माजी आमदार राजीव देशमुख अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काँग्रेसने रावेरची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी आमदार जयंत पाटील यांच्याकडे केली. दरम्यान आमदार जयंत पाटील यांनी डॉक्टर उल्हास पाटील यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले या विषयावर देवकर यांच्या निवासस्थानी चांगलाच खल सुरू होता. यासंदर्भात नेमका काय निर्णय झाला हे लवकरच जाहीर केले जाणार आहे.