रावेर- रावेर विधानसभा मतदारसंघात नागरीकांसाठी मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून नाव नोंदणी केली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. प्रांतधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार विजसकुमार ढगे यांनी तालुकाभरात कॉलेज व शाळांमध्ये जाऊन या मोहिमे संदर्भात जनजागृती केली. त्याचेच फलित म्हणून मतदारांनी मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत एक हजार 210 नवीन मतदारांनी आपले नावाची नोंदणी केली आहे. 12 जणांनी आपले नाव यादीतून वगळले आहे तसेच 125 मतदारांनी मतदान कार्ड दुरुस्ती केले आहे. पाच जणांनी यादी भाग बदल करण्यासाठी अर्ज केले आहेत. एक हजार 199 मतदारांनी नवीन कलर फोटो गोळा केले आहे तर 187 दिव्यांग मतदारांनी आपले नाव नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले.