रावेर विधानसभेची निवडणूक ताकदीनिशी लढवणार -अनिल चौधरी

0

रावेर- रावेर विधानसभा निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून जनतेने सहकार्‍यासोबत आशीवार्र्द द्यावा. तालुक्यात आहे त्यापेक्षा अधिक विकास मी करणार असल्याची ग्वाही युवा हृदय सम्राट तथा भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी येथे दिली. माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमता ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी, अ‍ॅड.योगेश गजरे, असदुल्ला खान, पंचायत समिती सदस्य जितू महाजन, पंकज वाघ, पिंटू वाघ, आबा चौधरी, युवराज महाजन, विशाल अग्रवाल, केवल नगरीया, अशोक वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.