रावेर शहरातील पेट्रोल पंपावर लूट

0

तहसीलदार प्रशासनाला युवा सेनेतर्फे निवेदन ; पदाधिकारी धडकताच पंप झाला बंद

रावेर- शहरातील बर्‍हाणपूर रोडवरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट होत असल्याची तक्रार युवा सेनेने तहसील प्रशासनाकडे केली आहे. पंपाच्या मशीनमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनकर्त्यांनी याबाबत संबंधित मालकास विचारणा केली असता त्यांनी पंप बंद केला व त्यात बिघाड झाल्याचे सांगत कंपनीला कळवले असल्याचे सांगितले. पेट्रोल पंपावर मानकांप्रमाणे कुठल्याही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत त्यामुळे कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
युवा सेना शहराध्यक्ष राकेश राजेंद्र घोरपडे, रावेर शिवसेना शहर उपप्रमुख गोपाल सुधाकर माखरी, कन्हैया मो.गनवानी, रावेर शहर उपप्रमुख हर्षल बेलस्कर, दीपक महाजन, मयुर पाटील, मनोज वरणकर, नीलेश पाटील, विजय प्रकाश जगताप, हितेंद्र सदाशिव पाटील, जयेश पाटील, विकास शिंदे, चेतन कदम आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.