रावेर शहरात अक्षयतृतीयेनिमित्त बारागाड्या उत्साहात

0

रावेर । अक्षय तृतीय निमित्त शिवाजी चौकात बारा गाड्या उत्साहात संपन्न झाले. तसेच एका मोठ्या दगडा मुळे मोठा अपघात होता-होता टळला. अक्षय तृतीय निमित्त दर वर्षी बारा गाड्या ओढण्याची परंपरा असून भगत बाळु महाजन, बगले दिपक पाटिल, कांतिलाल महाजन यांनी सायकांळी साडे सहा वाजेच्या दरम्यान ओढण्यास सुरुवात केली गाड्या प्रचंड वेगाने हामदया शेटच्या घराजवळ बारागड्यांचा समारोप करण्यात आली.

भाविकांची प्रचंड गर्दी
तेथे थोडेशे वळण असल्याने गाड्या तेथून वळु न शकल्याने घराच्या बाजूला व गटारिच्या तोंडावर ठेवलेल्या दगडावर संपूर्ण गाड्या आपटाल्या त्यात सदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही. गाड्यांवर बसलेले सर्व भाविक एकमेकांच्या अंगावर ढकलले गेले लगेच काही जुने जानकार तेथे येऊन परत नागरिकांना गाड्यांवर बसून भगता मार्फत ओढन्यास सांगून बार गाड्या नेहमीच्या ठिकाणी ओढत नेल्या परंतु याबाबतची संपूर्ण शहरात एकच चर्चा होती.