रावेर- शहरातील श्रीनाथ कॉलनी भागातून एकाच दिवशी तीन दुचाकी चोरीला गेल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. परप्रांतातून चोरट्यांची टोळी आल्याचा व सक्रिय झाल्याचा संशय असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. श्रीनाथ कॉलनीत मेडिकल व्यावसायीक प्रवीण लक्ष्मण सरोदे व त्यांचे बंधू भूपेंद्र सरोदे राहतात. दोघा भावांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 सीई 9365) व (एम.एच.19 ए.डी.7633) या दुचाकी तसेच सरोदे यांच्या शेजारीच राहणार्या नितीन काशीनाथ पाटील यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 ए.जे.3580) शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी प्रवीण सरोदे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध 50 हजार रुपये किंमतीच्या दुचाकी लांबवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.