रावेर शहरात घरफोडीत 34 हजारांचा ऐवज लंपास

0

रावेर। बंद घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 34 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना गायत्री नगर परिसरात घडली असून याबाबत रावेर पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील मानकर प्लॉट मधील गायत्री नगर येथे योगेश वसंत भट हे राहतात ते वैयक्तिक कामासाठी बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या किचनचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला व गोदरेज कपाटाचे लॉक तोडून 4 हजार रोख 18 हजार 200 रुपयेांचे सोन्याचे आणि 12 हजार रुपयांचे चांदीचे भांडी असे एकूण 34 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. योगेश भट यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. तपास फौजदार ज्ञानेश फडतरे करीत आहे.