रावेर शहरात जुगार अड्यावर धाड : आठ जणांना अटक

0

रावेर- शहरातील फुकटपूरा नगरात पोलिसांनी धाड टाकून आठ जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. फत्ते नगर भागातील पाण्याच्या टॉकीजवळ पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, फौजदार मनोहर जाधव, कॉन्स्टेबल हरीलाल पाटील, जाकिर पिंजारी यांच्या पथकाने धाड टाकत खा गुलशर खा, नजीर शेख यांच्यासह आठ जणांना अटक केली. आरोपींकडून नऊ हजार शंभर रुपयांच्या रोकड जुगाराची साधने जप्त करण्यात आली.