रावेर- रावेर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये डेंगूची लागण झालेले सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यात दोन शहरातील तसेच पाच खेड्यांमधील रुग्णांचा समावेश आहे. शहरांमधील दृष्टी हॉस्पिटल, श्रीपाद हॉस्पिटल मध्ये डेंगू पॉझिटिव्ह असलेले रुग्ण आढळले आहेत. नागरीकांनी पाण्याचा साठा करू नये तसेच आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांमध्ये रावेर येथील अंकिता भावसार, स्मितल पाटील संगीता पाटील, शेख रमजान, योगेश पाटील, सुरेश लासुरे, गजानन पाटील यांचा समावेश आहे.