Looted Hotel in Raver ; Crime Against Both रावेर : शहरातील रुस्तम चौकातील ए वन चिकन सेंटर हॉटेलच्या गल्ल्यातून दोघा संशयीतानी जबरीने पंधराशे रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावली तर या प्रकारास विरोध करणार्या हॉटेल मालकाच्या अंगावर कढईतील गरम तेल लोखंडी झर्याने फेकत संशयीत पसार झाले. ही धक्कादायक घटना बुधवार, 10 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
गल्ला लूटून आरोपी पसार
रावेर शहरातील उटखेडा रोडवरील रुस्तम चौकात शेख तन्वीर शेख शकील अहेमद यांची एवन चिकन सेंटर हॉटेल आहे. बुधवार, 29 रोजी रात्री आठ वाजता हॉटेल मालक हॉटेलमध्ये काम करत असतांना संशयीत आरोपी सलीम बेग अजीज बेग (उटखेडा रोड, रावेर) व शेख तौसीफ शेख अफजल (पाण्याच्या टाकीजवळ, फतेहनगर, रावेर) यांनी हॉटेलात प्रवेश करीत गल्ल्यातील पंधराशे रुपये जबरीने काढून घेतले तर हॉटेल मालक शेख तन्वीर शेख शकील अहेमद यांनी दोघा चोरट्यांना त्यास विरोध करताच आरोपींनी लोखंडी कढईतील गरम तेल लोखंडी सरोट्याने हॉटेल मालकाच्या अंगावर फेकल्याने हॉटेल मालक गंभीर जखमी झाले. याबाबत शेख तन्वीर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.