रावेर शहरामधील दारु दुकानांना लागले टाळे

0

रावेर । शहरासह परिसरात दारु, परमिट बियरबार, वाइन शॉपसह सर्व दुकानांना शनिवार 1 पासून टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे दारुड्यांची दिवसभर दाणा-दाण उडाली. सर्वोच्च न्यायालयानेे शनिवार 1 एप्रिल पासून दारु, परमिट बियरबार, वाईन शॉपचे दुकान महामार्गापासून 500 मीटरच्या आत असणारे बंद करा, असा आदेश केल्यानंतर 1 रोजी रावेरातील अनेक दुकानांना सकाळपासूनच टाळे लावण्यात आले होते. तर काहिंनी आपल्या शॉपमधील सर्व माल खपविण्यासाठी जोरदार विक्री करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत उघडे राहून सर्व माल विक्रीचे काम चालु होते.

बंदमुळे कामगार रस्त्यावर
अनेक वर्षांपासून दारु, परमिट बियरबार, वाइन शॉपच्या दुकानांमध्ये कामगार, वेटर काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. परंतु आता 31 रोजी पासुन त्यांना सुरु असलेला रोजगार सोडून ऐन उन्हाळ्यात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. आज शहरातील प्रमुख हॉटेलवर फेरफटका मारला असता अनेक कामगार आपल्या बंद शॉपच्या बाहेर उभे होते.

सकाळपासून रावेर परिसरातील एकही वाइन शॉप उघडले नाही, प्रत्येक दुकान चालकांच्या तोंडावर निराशा दिसत होती. प्रत्येक मालक म्हणत होता, काहीतरी मार्ग लागेल, दुकाने उघडतील, अश्या आशेवर प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत होते. दारु पिवून सैराट वाहन चालवत अपघात होण्याचे प्रमाण जास्त होत असतांना कोर्टाने दारुवर आणलेली बंदीमुळे महामार्गावर अपघात होणार नाही, असे काही वाहनचालक सांगतात माहामार्गावरील दारु बंदचा फायदा नक्की होणार, असे दिसत आहे. सकाळपासून रावेर परिसरातील एकही वाइन शॉप उघडले नाही, प्रत्येक दुकान चालकांच्या तोंडावर निराशा दिसत होती. प्रत्येक मालक म्हणत होता, काहीतरी मार्ग लागेल, दुकाने उघडतील, अश्या आशेवर प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत होते. दारु पिवून सैराट वाहन चालवत अपघात होण्याचे प्रमाण जास्त होत असतांना कोर्टाने दारुवर आणलेली बंदीमुळे महामार्गावर अपघात होणार नाही, असे काही वाहनचालक सांगतात माहामार्गावरील दारु बंदचा फायदा नक्की होणार, असे दिसत आहे.