रावेर- रावेर शहरासह सातपुड्यात डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाल्याने शनिवारी कर्जोद नदीला पूर आला तर पूर्व भागातील नेहेते, दोधे, खिरवड, अजनाड आदी ठिकाणी कुठे रीमझिम तर कुठे जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. शनिवारी तालुक्यात झालेला पाऊस सर्वाधिक खानापूर सर्कलमध्ये 37 एम.एम.पावसाची नोंद करण्यात आली तर पाल, आभोडा, गारखेडा, जिन्सी, रसलपुर, मुंजलवाडी रावेर शहर परीसरात पावसाने दमदार हजरी लावली.