रावेर (शालिक महाजन) : रावेर शहरातील उटखेडा रस्त्यावरील सप्तश्रृंगी नगरात 46 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. खुनाची माहिती कळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता संजय महाजन (46) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
खुनाचे ठोस कारण कळेना
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील उटखेडा रस्त्यावर सप्तश्रृंगी नगर असून या नगरातील रहिवासी असलेल्या सुनीता संजय महाजन (46) या विवाहितेचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संशयीत पसार झाला आहे. खुनाची माहिती कळताच पोलिस निरीक्षक कैलास नागरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सचिन नवले, विजू जवरे आदींनी धाव घेत माहिती जाणून घेतली.