रावेर । संजय गांधी निराधार समितीची तहसील कार्यालया जम्बो पाच तास बैठक झाली यात विविध योजनेचे 255 प्रकरने मंजूर करण्यात आली तर कागद पत्राची तृटी पूर्ततावर 55 प्रकरने मंजूर करण्यात आली आहे.तर 222 प्रकरने नामंजूर करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, संजय गांधी निराधर समितीची आज तहसील कार्यालयात बैठक झाली. यामध्ये 31 मे पर्यंतचे विविध योजनेसाठी आलेले सर्व अर्जची छाननी करून मंजूर करण्यात आले यात संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना यातली मंजूर झालेले प्रकरणे आहे. या बैठकीला संजय गांधी निराधारचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सचिव तथा तहसीदार विजयकुमार ढगे सदस्य डॉ.मिलिंद वानखेडे, महेश चौधरी, स्वाती चौधरी, संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार आर.पी.भावसार, जी.एन. शेरलकर, लिपिक अमोल घाटे आदी उपस्थित होते.