रावेर-सप्तशृंगी गड बस सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

0

सावदा । रावेर ते सप्तसृगी गडावर नवरात्री निमित्य रावेर तालुक्यातील भक्त गणाच्या देवी दर्शनसाठी त्वरीत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी रास्त मागणी शिवसेने केली आहे. अन्यता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेतर्फे रावेर बस आगार यांना दिला आहे. रावेर ते सप्तश्रुंगी गड बस ही कायम स्वरूपी रावेर आगारची त्वरित सुरू करण्यात यावी, सदरहून बस अनेक वसरशापासून बंद असल्याने रावेर तालुक्यातील भक्त गणांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

त्याकरणाने तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, खाजगी वाहनाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने या कारणास्तव मोठा महसूल बुडत आहे. तसेच रावेर तालुक्यातील प्रवाशी, नोकर, विद्यार्थी व कामानिमित्त जाणार्‍यांना जळगावहून फैजपूर, सावदा, रावेर येथे परत येण्यासाठी दुपारी 5 नंतर फक्त रात्री 8.30 लाच औरंगाबाद रावेर हीच एकमेव बस असलयाने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, यास जबाबदार कोण आहे. त्वरित वरिष्ट अधिकारी यांनी लक्ष द्यावे अन्यथा शिवसेना बस रोको आंदोलन करील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.