रावेर स्थानकावर मिळावा सचखंड एक्सप्रेसला थांबा

0

रावेर । येथील रेल्वेस्थानकात सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळावा, तसेच सकाळी भुसावळकडे जाणारी पॅसेंजर भुसावळ स्थानकात वेळेवर पोहचावी या मागणी संदर्भात प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत खासदार रक्षा खडसे व स्टेशन मास्तरांना दिले. नोकरदार वर्गांना रावेरहून भुसावळला जाण्यासाठी इटारसी- भुसावळ व कटनी – भुसावळ पॅसेंजर या दोनच प्रवासी गाड्या उपलब्ध आहेत. मात्र या गाड्यांना भुसावळ जाण्यासाठी दीड तासापेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे पुढील प्रवासासाठी गाड्या मिळत नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

पॅसेंजर गाड्या वेळेत चालविण्यात याव्या
भुसावळ – सुरत व भुसावळ- नाशिक शटल तोपर्यंत निघून जात असल्याने रावेर येथून जाणार्‍या गाड्या वेळेवर चालविण्यात याव्यात तसेच रावेर येथून भुसावलए जळगाव येथे अप डाऊन व जाणर्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र सकाळी जळगावला जाण्यासाठी थेट रेल्वे गाडी नाही. सकाळी सात वाजता जाणारी पॅसेंजर नेहमी भुसावळ रेल्वे स्थानकात उशिरा पोहचते. यामुळे जळगावकडे जाणार्‍या सुरत व नाशिक शटल निघून जातात. हा आता नित्याचाच प्रकार होत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड बसतो. रेल्वे प्रशासनाने सकाळी पॅसेंजर गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर वेळेवर पोहोचावी याकडे लक्ष द्यावे, प्रवाशांना जळगाव येथे थेट जाण्यासाठी सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळावा असेही निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, दीपक सुर्यवंशी, अक्षय शिंदे, गौरव सपकाळे, मयुर कापडे, निलेश धनगर, गौरव महाजन, निशांत पाटील, शेख शाहीद शेख जावीद, शेख मुजाईद, आदील तडवी, विजय धनके, चेतन महाजन, गौरव सुतार, महेंद्र सोनवणे, अविनाश तायडे, गणेश सोनवणे, डिगंबर मुर्‍हाळकर, अभिजीत इंगळे, जितेंद्र धनगर, शुभम प्रजापती, माधव चौधरी उपस्थित होते.