निगडी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भक्ती-शक्ती चौक येथे देशातील सर्वाधिक 107 मीटर उंचीवर उभारलेल्या राष्ट्रध्वजाचे धागे ओढले गेले असून शिलाई उसवली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हा ध्वज उतरविण्यात आला आहे. या ध्वजाचे वजन 80 किलो आहे. वार्याचा वेग आणि वजनामुळे वारंवार ध्वज काढण्याची वेळ येत आहे. वार्याचा फटका बसला की शिलाई उसविली जात आहे. शिलाई बसवून आणली असून उद्या (शुक्रवारी) ध्वजारोहण करण्यात येणार असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी सांगितले. उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक उंची असलेला दोन नंबरचा हा ध्वज आहे. प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला ध्वजाचे अनावरण करण्यात आले होते. या राष्ट्रध्वजाचे कापड 120ु80 असून वजन 80 किलो आहे. त्यामुळे वार्याचा वेग वाढला की ध्वजाची शिलाई उसविली जाते. शिलाई उसवल्यामुळे आजपर्यंत चार वेळा ध्वज उतरविण्यात आला होता.