राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी निवडणूक

0

नवी दिल्ली/मुंबई : राष्ट्रपतिपदासाठी सोमवारी ‘एनडीए’चे रामनाथ कोविंद व ‘यूपीए’च्या मीराकुमार यांच्यातून एकाची निवड करण्यासाठी देशातील सर्व आमदार-खासदार सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान करतील. मतमोजणी मंगळवारी, 20 जुलै रोजी 11 वाजता केली जाईल. राष्ट्रपति प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी समाप्त होतोय. नवनिर्वाचित राष्ट्रपति 25 जुलै रोजी पदभार सांभाळतील.

खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिका असतील. मैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेडने निवडणूक आयोगाला पुरविलेले खास मार्कर पेनच वापरता येतील; सदस्यांना स्वत:चे पेन वापरता येणार नाहीत. या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधानसभेत तयारी पूर्ण झाली आहे.

कोविंद यांचे पारडे जड
कोविंद यांना सत्ताधारी राजग, जदयू, बीजद, अन्नाद्रमुक, टीआरएस सहित अनेक छोट्या पक्षांनी समर्थन दिलेय. मीरा कुमार यांना कॉंग्रेसशिवाय अन्य 16 पक्षांचे समर्थन आहे.

मते फुटू नयेत म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा आटापिटा
विरोधी पक्षांचे काही आमदार कोविंद यांना मतदान करणार असल्याच्या अपक्ष आमदार रवी राणा यांच्या दाव्यामुळे, महाराष्ट्रातील मते फुटू नयेत म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रविवारी आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. दोन्ही पक्षांचे विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसचे 8 ते 9 आणि राष्ट्रवादीचे 5 ते 6 आमदार कोविंद यांना मतदान करतील, असा सत्ताधारी पक्षाकडून दावा केला जातोय. मात्र, विरोधकांचे एकही मत फुटणार नाही, असा विश्वास राधाकृष्ण विखे-पाटील व अजित पवार यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.

संख्याबळ विरोधात असले तरी विरोधी पक्षांनी फुटीच्या आणि जातीय राजकारणाविरोधात लढलेच पाहिजे. देशाला धर्मांध शक्तींच्या ताब्यात जाऊ देता कामा नये. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासारखी वैधानिक पदेही सध्या धोक्यात आली आहेत. घटना आणि कायद्याचे संवर्धन, संरक्षण आणि सुरक्षा या दोन पदांवरील व्यक्तींच्या हातात सोपवलेली असते. तिच्या रक्षणासाठी आपण एकदिलाने, निकराने लढू.
– सोनिया गांधी

10,98,903
एकूण मते

5,49,408
खासदारांची मते

5,49,495
आमदारांची मते

कुणाजवळ किती मते
4,42,117
भाजपा

1,61,478
कॉंग्रेस

63,847
तृणमूल कॉंग्रेस

31,116
तेलुगुदेशम

25, 893
शिवसेना

26,060
समाजवादी

27,069
मार्क्सवादी कम्युनिस्ट

8,200
बहुजन समाज पार्टी

20,935
जद यू

18,796
राष्ट्रीय जनता दल

18,352
द्रविड़ मुनेत्र कळघम

15,857
राष्ट्रवादी