राष्ट्रपतींच्याहस्ते होणार सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन

0

नागपूर । शहरात बांधण्यात आलेल्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे 24 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यादृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा करून सभागृहाची पाहणी केली. शहरात भव्य व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

या वातानुकूलित भव्य सभागृहाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, तसे निमंत्रण राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर गडकरींनी सभागृहाची पाहणी केली. यावेळी या उद्घाटन कार्यक्रमास सभागृहात दोन हजार रसिकांसाठी आसन व्यवस्था आहे. आकर्षक व भव्य असा रंगमंच आहे. याशिवाय हे सभागृह अत्याधुनिक सुविधांसह सज्ज करण्यात आले आहे. गडकरींनी हे सभागृह महापालिकेनेच चालवावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या.