परभणी- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वॉट्सअप ग्रूपवर टाकल्याबद्दल दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोन्ही जण मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याने खळबळ उडाली आहे.
व्हाट्सअपवरील एका ग्रुप मध्ये भारताचे नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. एका खाजगी संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या राजकुमार धबडे याने ही टिप्पणी केली. त्यांवर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या दत्ता पवार याने समर्थन दिलं. याविरूध्द स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या तक्रार अर्जावरून सोनपेठ पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांविरुद्ध भा.दं.व कलम 500, 501 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.