राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलैला

0

नवी दिल्ली । निवडणूक आयोग राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या 17 जुलैला ही निवडणूक होईल. याबाबतची घोषणा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त वसीम जैदी यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना 28 जूनपर्यंत अर्ज भरता येणार असून 1 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. गरज वाटल्यास 17 जुलैरोजी मतदान होईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तर मतमोजनी 20 जुलै रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदान होईल. तर 20 जुलैरोजी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत असल्याची माहिती आयोगाने दिली. 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीए सरकारची परिस्थिती आणखी मजबूत झाली आहे.

13 टक्के मते ठरवणार कोण होईल घटनात्मक प्रमुख
एनडीए सरकारला आपल्या पसंतीचे राष्ट्रपती निवडण्यासाठी केवळ 20 हजार मतांची आवश्यकता आहे. यासाठी संयुक्त लोकशाही आघाडीला बिगर यूपीए आणि बिगर एनडीए घटक पक्षांचा शोध घ्यावा लागणार आहे. या पक्षांचा मतांचा आकडा 13 टक्के आहे. हेच 13 टक्के राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल ठरवणार असे सांगितले जात आहे.