राष्ट्रपतीपदासाठी दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व आमनेसामने

0

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. रालोआच्या वतीने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करण्यात आले. कोविंद राष्ट्रपती होणार हे निश्‍चित समजले जात असतांनाच दुसर्‍या बाजूला काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावाची घोषणा केली.
मीरा कुमार यांच्या नावाच्या घोषणेमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघू लागले आहे. भाजपला राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध करू द्यायची नाही, म्हणून मीरा कुमार यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. कारण कोविंद यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी रालोआकडे पुरेसे बहुमत आहे. असे असतांना विरोधकांनी मीरा कुमार यांना या आखाड्यात का उतरवले, असा प्रश्‍न सध्या सर्वांणा भेडसावत आहे. कारण कोविंद यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाला तोडीस तोड मीरा कुमार यांचे व्यक्तीमत्त्व आहे.

राजकीय करिअर
कोविंद हे उत्तर प्रदेशात अनुसूचित जातीमध्ये येतात. त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. 1977 ते 1979 सालापर्यंत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात वकिली केली. 1991 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 1994 साली त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. 2000 साली त्यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले. 2015 साली त्यांनी बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले. तर मीरा कुमार ह्या माजी उप पंतप्रधान जगजीवन राम यांची मुलगी आहे.
मीरा कुमार 1973 साली भारतीय विदेश सेवामध्ये सहभागी झाल्या. त्यांची अनेक विदेशांमध्ये नियुक्ती करण्यात आली. 3 जून 2009 रोजी मीरा कुमार यांची लोकसभामध्ये अध्यक्षपदी नियुक्ती केली. 80च्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1975साली त्या प्रथम लोकसभेत निवडून गेल्या. त्यानंतर 1990 साली काँग्रेस कार्यकारिणी समितीमध्ये सदस्य बनल्या. पुढे अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये त्या महासचिव बनल्या. त्यानंतर पुन्हा दोन वेळा त्या खासदार बनल्या. यूपीए 1 च्या सरकारमध्ये त्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या मंत्री बनल्या.

दलित चेहरा
रामनाथ कोविंद हे कानपुर येथे राहणारे असून ते भाजपमधील मोठे दलित व्यक्तीमत्त्व समजले जाते. भाजपने कोविंद यांच्या नावाची घोषणा करून अनेक हेतू साध्य केले आहेत. काही राज्यांमध्ये भाजपचा दलित विरोधी चेहरा बनला आहे, तो पुसून टाकण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे काँग्रेसनेही नावाजलेले दलित व्यक्तीमत्त्व म्हणून मीरा कुमार यांना उमेदवारी दिली. काँग्रेसनेही कोविंद यांच्या तोडीस तोड आणि दलित समुदयातील व्यक्तीमत्त्व या निवडणुकीत उतरवले, त्यामुळे काँग्रेसने रालोआच्या उमेदवाराला विरोध करून दलित विरोधी राजकारण केले, असा संदेश जाऊ नये याची खबरदारी घेतली.

सौम्य स्वभाव
रामनाथ कोविंद यांच्या नावाला एकही वाद चिकटला नाही. तर मीरा कुमार या देखील कोणत्याही वादाशी जोडलेल्या नाहीत. कोविंद यांचा स्वभाव सौम्य आहे, तसा मीरा कुमार यांचा स्वभावही मृदुभाषी आहे.