राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

0

नवी दिल्ली – आज २०१९ हे वर्ष उजाडले आहे. देशभरात आज नवीन वर्षाचे स्वागत होत आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. दरम्यान देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नवीन वर्षाच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ”सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्ष २०१९ देशवासियांना व संपूर्ण जगातील समुदायांच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती व आनंद लाभत राहो”.असे ट्विट करत राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो’, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.