भुसावळात स्वच्छतेसह कामगारांची आरोग्य तपासणी व गणवेशाचे वाटप
भुसावळ- शहर व विभागात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर स्वच्छता पंधरवड्याचा समारोपही या दिवशी झाला. भुसावळात पालिकेच्या स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच गणवेशाचे वाटप आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. पदाधिकार्यांनी यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळा परीसरात स्वच्छता अभियानही राबवले.
भुसावळात स्वच्छता अभियान
भुसावळ- जयंतीनिमित्त यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षा तसेच नगरसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले. नगरपालिकेच्या दवाखान्यात पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू ठाकूर, राजेंद्र नाटकर, अॅड.बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, परीक्षीत बर्हाटे, देवा वाणी, सतीश सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे राष्ट्रपित्यांना अभिवादन
भुसावळ- जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी वाचनालयात तसेच यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. पूजन माजी आमदार नीळकंठ फालक यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, जिल्हा उपाध्यक्ष फकरुद्दीन बोहरी, शहराध्यक्ष सलीम गवळी, तालुकाध्यक्ष अकिल शाह, जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब खान, अकील शाह, नितीन पटाव, संजय खडसे, कल्पना तायडे, जानी गवळी, छाया बोडे, लता हिरे, नवशान शाह, राजा भाई व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावलमध्ये स्वच्छता अभियान
यावल- यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता हीच सेवा अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी मुख्य बाजार आवारातील साफसफाई करण्यात आली. सभापती भानुदास चोपडे, संचालक नारायण बापू चौधरी, पुंजू डिगंबर पाटील, सुनील वासुदेव बारी, स्वप्निल बापूराव सोनवणे तसेच बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य बाजाराच्या आवारातील सर्व कचरा जेसीबीच्या सहाय्याने बाजाराच्या आवारात एक खड्ड्यात टाकण्यात आला.
यावल महाविद्यालयात सप्ताह समारोप
यावल- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महात्मा गांधी जयंती सप्ताहाचा समारोप झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एफ.एन.महाजन होते. प्रमुख वक्ते प्रा.नजमा तडवी होत्या. रासेयो विभाग अधिकारी प्रा.डॉ.प्रल्हाद पावरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजू तडवी, दर्शना पाटील या स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.राजू पावरा तर आभार सुरवाडे या विद्यार्थ्यांनी मांडले. महाविद्यालयाच्या प्रांगणात व बॉटनिकल गार्डनमध्ये श्रमदान करण्यात आले. प्रा.दिनेश वसावे, प्रा.सतीश वसावे, शिक्षकेतर कर्मचारी सावकारे व रासेयो विभागातील स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
कंडारी येथे गांधी जयंती उत्साहात
कंडारी- आयुध निर्माणी व कंडारी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गांधी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. आयुध निर्माणीचे प्रशासकीय चिकित्सा अधिकारी सूर्यप्रसाद, मीना यांची प्रमुख उपस्थिती होती. कंडारी ग्रामपंचायत सरपंच योगीता शिनगारे, उपसरपंच सैय्यद मुस्तफा, सदस्य डॉ.सुर्यभान पाटील, श्यामा मोरे, रामू जाधव, माजी उपसरपंच यशवंत चौधरी, पोलीस पाटील रामा तायडे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारत स्वच्छता अभियानांर्तगत पथनाट्य सादर करण्यात आले. गजानन कोळी, रूपेश बाविस्कर, रमेश मेढे, रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती. लक्ष्मण वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.