स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रावेर पंचायत समितीत उपक्रम
रावेर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रावेर पंचायत समितीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेच्या माध्यमातून चित्रकला व निबंध स्पर्धेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करून गौरवण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी गटविकास अधिकारी हबीब तडवी होते.
असे आहेत स्पर्धेतील विजेते
चित्रकला व निबंध स्पर्धेत अ गटात अजनाड येथील राणी झाल्टे प्रथम, द्वितीय- बबलू कुंभार (पातोंडी), तृतीय- निजाम शेख (खिर्डी) आला. ब गटात प्रथम- कोमल चौधरी (रसलपूर), द्वितीय- जया धनके, तृतीय गायत्री पाटील (केर्हाळे) आली. प्रसंगी पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, योगेश पाटील, सी.आर.महाले, दीपक पाटील, जितु पाटील, स्वच्छ भारत मिशन समन्वयक समाधान निंभोरे, भीमराव तायडे मंजूश्री पवार आदींची उपस्थिती होती.