चाळीसगाव : राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जयंतोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो, यात ठिकठिकाणी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत असते. याच पार्श्वभूमीवर 24 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहात येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीच्या पदाधिका-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव शहरात कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली,यात दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीच्या वतीने अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात शहरातून सकाळी रॅली काढण्यात येणार असून त्यात जिजाऊ मातेच्या विचारांवर आधारित पथनाट्य तदनंतर राष्ट्रीय य.ना.चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती
शहरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षाच्या पदाधिकार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी सोनल साळुंखे, कावेरी पाटील, प्रकाश पाटील, सुजीत पाटील, स्वप्निल कोतकर, स्वाती रोकडे, ज्योती बाविस्कर, संजय साळुंखे, शेखर निंबाळकर, संदीप साळुंखे, योगेश साळुंखे,शांताराम पाटील,महेश पाटील,रुपेश पाटील, निलेश गायके, योगेश चव्हाण, निलेश वाघ आदी उपस्थित होते.