मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला सपशेल अपयश आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान आता राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची 1 जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित असणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. एक अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पुरस्कृत नवनीत राणा निवडून आल्या आहेत. बारामती, शिरुर, सातारा, रायगड वगळता राष्ट्रवादीला एकाही जागांवर विजय मिळविता आला नाही.