अंबरनाथ । दिवसेंदिवस वाढत असलेले गॅस सिलेंडरचे दर व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या अंबरनाथ शहराध्यक्षा पूनम शेलार यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची सुरुवात अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौक येथून करण्यात आली होती. तर तहसीलदार प्रशांत जोशी यांना निवेदन देऊन तहसीलदार कार्यालय येथे मोर्चांची सांगता करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, युवक शहराध्यक्ष अभिजित करंजुले-पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, प्रदेश सरचिटणीस प्रिसीला डिसेलवा, नगरसेवक सचिन पाटील, समाजसेविका आशा सदाशिव पाटील, सोशल मीडिया सेलचे विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे, विनोद शेलार, स्वाती पवार, अरुणा दाबोळकर, स्मिता पंगेरकर, नंदा तळोळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.