चाळीसगाव। चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मालेगाव रोडवरील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. जम्मु काश्मीर येथील उरी तसेच छत्तीसगड मधील सुकामा येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्हात शहीद झालेले जवान, शेतकरी आंदोलनात बळी गेलेले शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक संघटनेतील पदाधिकार्यांच्या मृत नातेवाईक व्यक्तींना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी शहराध्यक्ष शाम देशमुख, जालम पाटील, रतन साळुंखे, शिवाजी आमले, माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, सीताराम अजबे, पंडीत चौधरी, जि.प.सदस्य भूषण पाटील, पं.स.सदस्य अजय पाटील, शिवाजी सोनवणे, विष्णू चकोर, नगरसेवक दिपक पाटील, बाजार समिती संचालक प्रकाश पाटील, आर.के.माळी, एन.एम.पाटील, ईश्वर ठाकरे, अॅड.प्रदीप अहिरराव, जयाजी भोसले, गोपाळराव देशमुख, पिनल पवार, जगदीश चौधरी, अनिल जाधव, सदाशिव गवळी, युवक शहराध्यक्ष अमोल चौधरी, उपाध्यक्ष शुभम पवार, निरज अजबे, विनीत गवळी, यज्ञेश बाविस्कर, शिवसागर पाटील, ऋषीकेश देशमुख, निखिल देशमुख, यशवंत पाटील, कुशल देशमुख, अजिज खाटीक, रावसाहेब सोनवणे, विनोद राठोड, शंकर गवळी, विजय शितोळे, पृथ्वीराज चौधरी, अजय पाटील, धनंजय देशमुख, राजीव जाट, शुभम मोहिते, गुंजन मोटे, कपिल पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले तर आभार अभिजीत शितोळे यांनी मानले.
पाचोरा येथे रुग्णांना फळ वाटप
पाचोरा । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सतरावा वर्धापन दिन माजी आमदार दिलीप वाघ यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपन्न झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादीच्या ध्वजाला सलामी देण्यात आली आणि त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी आमदार दिलीप वाघ, क्षेत्र प्रमुख संजय वाघ, नितीन तावडे, विकास पाटील, रणजित पाटील, मोतीलाल चौधरी यांनी भेट देऊन रुग्णांना फळे आणि बिस्कीट वाटप केले. यावेळी प्रकाश भोसले,प्रा भागवत महालपुरे, बशीर बागवान, अरुण पाटील, आकाश वाघ, गौरव वाघ, वाय.ओ.पाटील, आकाश वाघ, अजहर खान, हारून देशमुख, शांताराम चौधरी, ए.जे.महाजन, गौरव वाघ, भगवान मिस्तरी, सूर्यकांत नाईक यांचेसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार यांच्या कार्याची माहिती
गेली 18 वर्षे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गौरवशाली वाटचाल आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी विचारांवर निष्ठा ठेवून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वर्धापन दिनाच्या निमित्ताने नव्या जोमाने व आत्मविश्वासाने पक्षाला पुन्हा एकदा वैभव मिळवून देण्याचा सर्वांनी निर्धार करु या, असे आवाहन माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दुध संघाचे प्रमोद पाटील, माजी नगरसेवक भगवान पाटील, युवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.