राष्ट्रवादीचा विरोध झुगारून भाजपकडून जलतरण तलावाचे उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवड : संभाजीनगर रेथील जलतरण तलाव शनिवारी अखेर खुला झाला. माजी उपमुख्रमंत्री अजित पवार रांच्रा हस्ते महापालिका निवडणुकीच्रा तोंडावर रा तलावाचे यापूर्वी उद्घाटन झाले आहे. त्यामुळे त्याचे दुसर्‍यांदा उद्घाटन करणे योग्य नसून, केवळ श्रेयासाठी भाजपकडून हा खटाटोप केला जात असल्याची टीका करत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या मंगला कदम यांनी लोकार्पण सोहळ्यात गोंधळ घातला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या गोंधळावेळी भाजप कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. जलतरण तलावाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्यासाठी विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला खुले आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत भाजपने राष्ट्रवादीचा विरोध झुगारून लावला. भाजपने जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा यशस्वीरीत्या पार पाडल्याने राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन फारसे प्रभावी ठरले नाही.

राष्ट्रवादीकडून केवळ उद्घाटनाची घाई
फेब्रुवारी 2017 ला महापालिका निवडणूक असल्राने राष्ट्रवादी काँगे्रसने 21 डिसेंबर 2016 ला घाईघाईत तलावाचे उद्घाटन केले होते. उद्घाटनाची घाई केली. मात्र, तलाव खुला करण्राच्रा हालचाली होत नव्हत्रा. उन्हाळा सुरू झाला असताना, बांधून तरार असलेला तलाव खुला होत नसल्राबद्दल नागरिकांनी संताप व्रक्त केला होता. त्रामुळे भाजपच्रा नवनिर्वाचित नगरसेवकांनी तलाव खुल करण्राचे पत्र प्रशासनास दिले होते. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्राने भाजपने पुढाकार घेऊन तलाव खुला केला.

कोणाची खासगी मालमत्ता नाही : पवार
जलतरण तलावाचे निवडणुकीच्रा घाई गडबडीत उद्घाटन केले होते. निवडणुकीनंतरही हा तलाव बंदच होता. तलाव बांधून तरार आहे, मग रा सुविधेसाठी नागरिकांना प्रतीक्षेत ठेवण्राचे कारण काय? श्रेर वादाचा प्रश्‍न उद्भवत नाही. नागरिकांसाठी आहे, ते नागरिकांसाठी खुले केले. कोणाची खासगी मालमत्ता अथवा मक्तेदारी नाही, हे लक्षात घ्रावे, अशी प्रतिक्रिया सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.