121 सदस्यांचा समावेश; पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची जळगाव महानगर कार्यकरिणी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. नव्या काही पदांचा समोवश असलेल्या या कार्यकारिणीत 121 सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष 11, सरचिटणीस 10, संघटक 10, प्रभाग अध्यक्ष 19, वार्ड अध्यक्ष 10, कार्यकारिणी सदस्य 10, मीडिया प्रमुख 5, कायम आमंत्रित सदस्य 34 आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचा समावेश आहे.
समांतर रस्त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
समांतर रस्ते हा सध्याचा ज्वलंत प्रश्न असून या संदर्भात सुरू असलेल्या रस्ते कृती समितीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांनी दिली. नागरिकांच्या गराजांसंदर्भात किंवा महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारकडून तातडीने कार्यवाही होत नाही. नेहमी आंदोलने व उपोषणे करावे लागतात.या शिवाय कामे होत नाही, असा आरोप रविंद्र भैय्या पाटील यांनी यावेळी केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूीवर त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात, वार्डात योग्य कामे होण्याच्या दृष्टीने नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य नियुक्त करण्यात आले असल्याचेही रविंद्र पाटील यांनी सांगितले. कार्यकारिणी तयार करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ती पाठविण्यात आली होती. त्यास त्यांनी मंजूरी दिली असल्याचे महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी यांनी सांगितले.
मीडिया प्रमुख पदी मुकुंद एडके
राष्ट्रवादीच्या महानगर जिल्हा मीडिया प्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद एडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी यांनी ही नियुक्ती केली असून या नियुक्तीला प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मंजूरी दिली आहे. जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रचार, प्रसिद्धी विषयक कार्य करण्यासाठी पक्षाच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यांची झाली निवड
उपाध्यक्ष म्हणून रविंद्र मोरे, वाय. एस. महाजन, नदिम गफ्फार मलिक, अनिरूद्ध जाधव, अश्विनी देशमुख, लताताई मोरे, दिलीप सिकवाल, डी. डी. पाटील, सुरेशकुमार कुकरेजा, मंगलसिंग सोनवणे, शांताराम सूर्यवंशी, विधानसभाक्षेत्रप्रमुखपदी दुर्गेश पाटील, सरचिटीस म्हणून उज्वल पाटील, भरत कर्डिले, देवसिंग पाटील, किरण वाघ, विनोद शिंदे, संजय निकुंभ, जयप्रकाश चांगरे, महेश मराठे, तुषार सावंत, किरण राजपूत, चिटणीस म्हणून डॉ. सुभाष देशमुख, गजानन महाजन, शामकांत दाभाड, अॅड. एस. एस. पाटील, सोनाली देऊळकर, निलेश भामरे, सचिज घुगे, सुदाम पाटील, सुरेश नारखेडे, नंदू पाटील, संघटकपदी जयप्रकाश महाडिक, बी. डी. चिरमाडे, डी. आ. शिंपी, शांताराम पाटील, गणेश पाटील, मयुर चौधरी, आशिष तिवारी, सिताराम धनगर, प्रदिप भोळे, साजीद पठाण. यासह प्रभाग अध्यक्ष – आशा येवले, प्रभाग 1- योगिता दाभाळे, प्रभाग 2- दत्तात्रय पाटील, प्रभाग 3 – भारती मोरे प्रभाग 4- हेमचंद्र महाजन, प्रभाग 5- किरण राजपूत, प्रभाग 6- जितेंद्र चव्हाण, प्रभाग 7- निता सोनवणे, प्रभाग 8- मनिषा देशमुख, प्रभाग 9 – बशिर पिंजारी, प्रभाग 10- इस्माईल तडवी, प्रभाग 11- अशोक पाटील, प्रभाग 12- प्रमिला सपकाळे, प्रभाग 13 – अर्चना सोनवणे, प्रभाग 14 – आशिफ शेख, प्रभाग 15 – अमोल कोल्हे, प्रभाग 16 – गजानन देशमुख, प्रभाग 17 -सुनंदा पाटील, प्रभाग 18 – बाळू नन्नवरे, प्रभाग 19 यांची नियुक्ती करण्यात आली.
वॉर्ड अध्यक्ष – तुषार इंगळे, दुर्गाबाई पवार, सुषमा चौधरी, मंगला देवरे, अरुण गोसावी, रहिम तडवी, कोमल शिंदे, नलूबाई पाटील, प्रमिला सपकाळे, नसरीन अफजलखान यासह कार्यकारिणी सदस्या म्हणून ममता सोनवणे, कमलाबाई पाटील, गणेश पाटील, सलमा पटेल, अकबरभाई पहेलवान, अर्चना कदम, शोभा भोईटे, रवींद्र जडे, आशा सुर्यवंशी, सुमनताई बनसोडे, मीडियाप्रमुख मुकुंद एडके, निलेश बोदडे, संदीप पवार, सलीम इनमादार, तर प्रसिध्दीप्रमुख म्हणून राजू बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली.