राष्ट्रवादीची माघार: ‘त्या’ पाचही नगरसेवकांना परत पाठवणार !

0

मुंबई: पारनेर नगरपालिकेच्या पाच नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र यावरून खुद्द मुख्यमंत्री नाराज झाल्याचे बोलले जात होते. मुख्यमंत्र्यांनी ते पाचही नगरसेवक राष्ट्रवादीने परत शिवसेनेत पाठवावे असा निरोप अजित पवारांना दिला होता. दरम्यान आता राष्ट्रवादीने माघार घेतली असून त्या पाचही नगरसेवकांना परत पाठवणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा बारामतीत झाला होता.

पाच नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी हा निरोप अजित पवारांना दिला ओत.