मुंबई: आमदार निरंजन डावखरे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान यावेळी निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील आले होते. त्यामुळे आमदार नरेंद्र पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील हे खूप चांगले मित्र आहेत. मित्राला साथ देण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी दिली. नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत. निरंजन डावखरेंप्रमाणेच नरेंद्र पाटील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. नरेंद्र पाटील यांची विधानपरिषदेतील मुदत जुलै 2018 मध्ये संपत आहे.