नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे भाजपात प्रवेश करणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या होत्या.अखेर नाईक यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गणेश नाईक हे राष्ट्रवादीच्या 55 नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.