BREAKING: मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची माघार !

0

रोहिणी खडसे यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटीलांचे आव्हान

जळगाव: मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील हे निवडणुकीतून माघार घेतली आहे. दरम्यान त्यांची ही माघार झाल्यानंतर ते शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठींबा देण्याची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनीच माघार घेतल्याने पक्षाची नाच्चकी झाली आहे. रविंद्र पाटील यांची माघार झाल्याने आता भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांचे तगडे आव्हान आहे.

मुक्ताईनगर मतदार संघातून भाजपतर्फे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. मागील निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथराव खडसे यांना आव्हान दिले होते, त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता.