नंदुरबार । राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,ना.सुनील तटकरे,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, चित्राताई वाघ हे नेते दि. 14 जुलै रोजी नंदुरबार येथे येत आहेत,अशी माहिती पक्षाचे निरीक्षक उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपमध्ये गेलेले डॉ. विजयकुमार गावित यांची घुसमट होत असून ते पुन्हा राष्ट्रवादीत परत येतील, असा दावा देखील त्यांनी पत्रकार परिषदे व्यक्त केला.
कार्यकर्ता मेळावा होणार
राज्यव्यापी संघटनेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत.आगामी लोकसभा,विधानसभा,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यात येत आहे.त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासह वरीष्ठ नेते,14 जुलै रोजी नंदुरबार येथे येत आहेत. सुरवातीला कार्यकर्त्याचा मेळावा होईल,या मेळाव्यात ते संवाद साधतील. त्यानंतर पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतील. या दौर्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची आगामी भूमिका ठरणार आहे.
विजयकुमार गावितांचा केवळ राजकिय वापर
भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचा वापर भाजपने केवळ राजकिय हेतूने केला आहे.मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा त्यांची सीबीआय चौकशी लावण्यात येऊन ब्लॅकमेल केले जाते.त्यांच्या राजकिय ताकदीची कदर भाजपाने केली नाही.त्यामुळे गवितांची घुसमट होत असून ते स्वगृही परत येतील असा दावा उमेश पाटील यांनी केला आहे.भाजपात केवळ गावित गेले आहेत.कार्यकर्ते नाही.ते राष्ट्रवादीतच आहेत असा ही दावा पाटील यांनी केला.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्याक्ष राजेंद्र गावित हे उपस्थित होते.