राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष डॉ. पाटील यांचा राजीनामा

0

भुसावळ : नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही जागा निवडून न आल्याने पक्षावर नामुष्की ओढविली आहे. याची नैैतिक जबाबदारी स्विकारुन शहराध्यक्ष डॉ. दिपक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. सतिश पाटील यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. यात त्यांनी जिल्हाध्यक्षांवर टिका केली असून निवडणुकीत जिल्हाध्यक्षांना वेळोवेळी भुसावळ शहरात सभा घेण्याबाबत विनंती केली परंतु ते भुसावळला आलेच नाही व नगराध्यक्षपदाचा दिलेला उमेदवार निष्क्रिय होता. यामुळे पक्षाची एकही जागा निवडून आली नाही. याची नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, याअगोदर पक्षातील काही पदाधिकार्‍यांनीदेखील वरिष्ठ पदाधिकार्‍यांची प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला होता.